भुजबळ यांना उमेदवारी मिळण्यासाठी प्रयत्न करणार....

नगर : अहमदनगर शहरात मंगल भुजबळ यांना चांगले वातावरण आहे. त्यांच्यासाठी आम्ही वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न करणार आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या ओबीसी विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष कॅप्टन अजयसिंह यादव यांनी केले.


अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या ओबीसी विभागाचा मेळावा झाला. यावेळी काँग्रेस ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी, राष्ट्रीय समन्वयक मंगल भुजबळ यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते

राजकारणात बिहारचे मुख्यमंत्री नीतिशकुमार हे पलटूराम म्हणून ओळखले जातात. आता त्यांच्या जोडीला चंद्राबाबू नायडू यांच्या कुबड्या मोदी सरकारला आहेत. त्यामुळे येत्या एक-दोन वर्षांत हे दोघेही मोदी सरकार पाडतील, असा दावा यादव यांनी केला.

मराठा समाजाने ओबीसीमधून आरक्षण मागितले आहे. यावर स्पष्ट भाष्य करण्यास यादव यांनी नकार दिला. सरकारने याबाबतचा निर्णय घ्यावा. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व ज्येष्ठनेते शरद पवार यांनी याबाबत मध्यम मार्ग काढण्याबाबत सुचवले. यंत्रणा आहे, अशांना उमेदवारीस पसंती दिली जाणार आहे. काँग्रेसचा निधी सिझ (जप्त) झाला असल्याने ज्या उमेदवाराकडे निधी आहे, त्यालाही पसंती असेल. 

मोदी सरकार पडल्यावर इंडिया आघाडी सरकार स्थापन करू शकते. मात्र, मोदी तसे होऊ न देता नव्याने निवडणुका देशावर लादतील, असा दावाही कॅप्टन यादव यांनी केला.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post