कुकडीच्या ओव्हर-फ्लोच्या पाण्यापासून आढळगाव वंचित... शेततळी कोरडीच...

श्रीगोंदा : श्रीगोंदा तालुक्यातील पुर्व भागात वितरिका क्रमांक १२,१३ व १४असुन मागील उन्हाळी आवर्तनात  हाच भाग वंचित राहिला होता याचा परिणाम लोकसभा निवडणुकीत दिसून आला.  


आता कुकडीचे ओव्हरफ्लोचे आवर्तन सुरू असताना देखील आढळगाव भागातील वितरिका क्रमांक १२व १३ च्या लाभक्षेत्रात पाऊस झाला  असला तरी शेतकरी वर्गाचे शेततळे रिकामे असताना देखील चालू आवर्तनातुन या वितरिकांना पाणी आले नाही तर पुन्हा एकदा नाराजी उमटू  शकते अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. 

श्रीगोंदा तालुक्यात गेल्या महिनाभरापासून चांगला पाऊस झाला असला तरी शेततळी  अर्धवट आहेत. मागील आवर्तनात ही आढळगाव परिसरात कुकडी चे आवर्तन  आले नव्हते. त्याचा परिणाम लोकसभा निवडणुकीमध्ये दिसून आला असताना देखील या पुर्व भागात चालू अवर्तनाबाबत कालवा सल्लागार समिती सदस्य व अधिकारी हि उदासीन दिसत आहेत. 

मुख्य वितरिका क्रमांक १४ला पाणी सोडण्यात आले त्यानंतर वितरिका क्रमांक १३ला पाणी येण्याची शक्यता असताना अधिकारी वर्गाने विसापूर तलावात आवर्तन चालू केले आहे विसापूर भरल्यानंतर वितरिका क्रमांक १३चे पाहु असे अधिकारी सांगत आहेत. मात्र कुकडी च्या पाण्यासाठी रान उठवणारे आता मुग गिळून असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. 

फक्त राजकारणासाठी कुकडी च्या पाण्याचे भांडवल करणारे नेते मंडळी आता का? गप्प बसले आहेत हाही संशोधनाचा विषय आहे.

श्रीगोंदा तालुक्यात जुलै महिन्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असला तरी शेततळी अर्धवट आहेत पण सध्याचे ओव्हर फ्लो चे आवर्तन चालू असताना देखील   वितरिका क्रमांक १२व १३ला पाणी नाही ही शोकांतिका आहे

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post