शाळा ही चारीत्र्यवान माणूस तयार करणारी आई आहे .... .

चांदा : शाळा ही चारित्र्यवान माणूस तयार करणारी थोर आई आहे. या आईचा अवमान होऊ देऊ नका .जीवनात असं वागा की ज्यामुळे आपल्या आई-बापाची मान शरमेने खाली जाणार नाही . जीवनात व्यसन हे कर्तुत्वाचे लागावे. आजचे व्याख्यान हे मनोरंजन नसून परिवर्तन आहे .असे प्रतिपादन समाजसेवक व संस्कारभव व्याख्याते डॉ. वसंत हंकारे यांनी केले आहे . 


येथील जवाहर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय व चांदा ग्रामस्थ आयोजित १४ते २१ वयोगटातील मुलामुलींच्या आयुष्यात सकारात्मक परीवर्तन घडविणारी संस्कार दिपोभव एकदिवसीय कार्यशाळेच्या कार्यक्रमात  उपस्थित विद्यार्थी ,पालक ,शिक्षक यांना मार्गदर्शन करताना प्रसिद्ध समाजसेवक व व्याख्याते डॉ. वसंत हंकारे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षांनी अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाच्या खजिनदार डॉ . दिपलक्ष्मी म्हसे होत्या. 


प्रमुख पाहुणे म्हणून विद्यालयाये माजी विद्यार्थी  जिल्हाधिकारी डॉ. संतोष थिटे, सोनई पोलिस स्टेशनचे सपोनी आशिष शेळके ,डॉ. दीपक शिंदे, नानासाहेब आंबाडे, सौ .निर्मलाताई काटे, माजी जि प सदस्या विजयाताई अंबाडे , गावच्या सरपंच सुनंदाताई दहातोंडे व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. 

गेली महिनाभरापासून डॉ. वसंत हंगारे यांचा कार्यक्रम चांदा येथे होणार असल्याने याविषयीचे मोठे कुतूहल चांदा आणि परिसरात होते. कार्यक्रमासाठी पालकांसह आसपासच्या गावातील  नागरिकांची मोठी उपस्थिती होती. 

डॉ. हंकारे म्हणाले की,आज विद्यार्थ्यांना कृतज्ञता म्हणजे काय याची जाणीव होणे आवश्यक आहे .जगातील थोर पुरुषांनी स्वतःचा नव्हे तर जगाचा संसार केला. त्यामुळे ते आजही सर्वांसाठी दिपस्तंभ आहेत. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास हाच त्यांच्या यशाचा झेंडा आहे. आजच्या मुलींनी जिजाऊ, सावित्री ,अहिल्या व्हावे. जगातील सर्वात मोठे शिक्षण म्हणजे आपल्या आई-बाबांची सेवा करणे होय. कारण पैसा खर्च करून जगातील सर्व सुख विकत घेता येते .मात्र आई-वडील मिळत नाही. 

आपल्याला तारणारा आपला बाप असून त्या बापाची मान शरमेने झुकणार नाही असं काम आयुष्यात करू नका. मनाने ,शरीराने खंबीर व्हा ! तुमच हे वय शिक्षणाच वय आहे. त्यामुळे शिकून घ्या ! मुलींनी आपल्या आई बापांच्या मानसन्मान राखा .आज मोबाईलच्या जमान्यात अनेक नको ती दुष्कृत्य घडत आहेत. 

मुलींनी याबाबत जागरूक होऊन शिक्षक, आई-वडील सांगतील त्याप्रमाणे आपले आयुष्य घडवावे. आपल्यासाठी आपले आई-वडील काय कष्ट करतात किती त्रास घेतात याबाबत मुलांनी कृतज्ञ असावे. मात्र दुर्दैवाने सध्या कृतघ्नता पहावयास मिळत असल्याची खंत डॉ. हंकारे यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमासाठी विद्यालयाचे प्राचार्य हरिभाऊ जावळे ,उपप्राचार्य रघुनाथ भोजने, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कैलास दहातोंडे, जगन्नाथ भगत, माजी मुख्याध्यापक थिटे , माजी मुख्याध्यापक आसाराम कर्डीले, प्राध्यापक अशोक चौधरी ,

नानासाहेब शिंदे , शहाजी धुमाळ, दिपक जावळे, गणपत पुंड, अण्णासाहेब दहातोंडे,माजी पर्यवेक्षक मच्छिंद्र थिटे , माजी मुख्याध्यापक आसाराम कर्डिले , पर्यवेक्षक कातोरे, प्रसिध्दी विभाग प्रमुख प्रा. रावसाहेब राशिनकर, पत्रकार अरुण सोनकर,आयोजन समितीचे प्रमुख बंडू दहातोंडे , किरण दहातोंडे , अण्णासाहेब दहातोंडे, ग्रामपंचायत सदस्य सुभाष शिंदे,मच्छिंद्र दहातोंडे ,किरण जावळे,सागर धाडगे, संतोष कानडे ,वसंत भगत, जिजाबापु थोरात, शांता मरकड , देविदास दहातोंडे यांसह शिक्षणप्रेमी नागरिक, माता पालक, जवाहर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्काऊट मास्टर बाळासाहेब भोसले यांच्या कलर पार्टीच्या संचालनाचे सर्वानी कौतूक केले . सूत्रसंचालन उच्च माध्यमिक विद्यालय समन्वयक प्रा भाऊसाहेब तांबे,व सांस्कृतिक विभाग प्रमुख श्रीमती स्वाती दळवी यांनी केले तर आभार ज्येष्ठ शिक्षक संजय ढेरे यांनी मानले.

डॉ. हुंकारे यांचे व्याख्यान सुरू असताना पालक शिक्षक व विद्यार्थी सर्वजण भावनिक होऊन ढसाढसा रडत होते . व्याख्याना दरम्यान डॉ.हंकारे यांनी पालकांना स्टेजच्यासमोर उभा केले. व त्यांच्या मुलांमुलींना समोर येऊन आपल्या पालकांचा पदस्पर्श करून मिठीमारण्यास सांगितले. हा प्रसंग सर्वांसाठी अतिशय भावनिक होऊन गेला. अनेक विद्यार्थी मोठमोठयाने आपल्या पालकांविषयी असलेली आत्मीयता दाखवत ढसाढसा रडत होती .तर पालकांनाही आपले अश्रू अनावर झाले होते. हे पाहून उपस्थित पाहुण्यांचे डोळेही  पानावले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post