तीन उड्डाणपुलाच्या कामाचे भूमिपूजन...

नगर : सार्वजनिक बांधकाम विभाग अर्थसंकल्पात मंजूर झालेल्या शहरातील तीन उड्डाणपूल कामांचे भूमिपूजन पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते करण्यात आले.


या  कार्यक्रमाला आमदार संग्राम जगताप, जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले, जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.


सार्वजनिक बांधकाम विभाग अर्थसंकल्पात मंजूर झालेल्या शहरातील अहमदनगर-कोल्हार-शिर्डी रस्त्यावरील डिएसपी चौक उड्डाणपूल, नागापूर एमआयडीसी जवळील सह्याद्री चौक व सनफार्मा चौक या तीन दुपदरी उड्डाणपुलांच्या कामांचे भूमिपूजन  पालकमंत्री  राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते  करण्यात आले.


या प्रसंगी पालकमंत्री विखे यांनी अधिकार्यांकडून कामाची माहिती घेतली. या कामाचे भूमिपूजन झाल्यामुळे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. हे काम लवकर सुरु करून काम पू्ण तत्काळ करावे अशी मागणी यावेळी केली.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post