श्रीगोंदा ः श्रीगोंदे-नगर विधानसभा निवडणुकीत भाजपाचा उमेदवार कोण असेल याव सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. सध्या श्रीगोंद्यातून युवराज उभे राहणार असल्याची चर्चा असून युवराज सध्या प्रसिध्दीचा स्टंट करीत आहेत. परंतु हा स्टंटच त्यांच्या अंगलट आला असल्याची चर्चा सध्या कार्यकर्त्यांमध्ये सुरु झालेली आहे. अति घाई संकाट नेई या म्हणीचा प्रत्यय युवराजला आलेला असूनही सध्या दाजीच्या सल्ल्याने युवराजची घाईच सुरु आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमधून तेव्हढाच त्यांना विरोध होत आहे.
युवराजने मागील दहा वर्षांपूर्वी दक्षिण लोकसभा मतदारसंघात मोठा जनसंपर्क केला होता. त्या वेळी त्यांनी कार्यकर्त्यांची फळी उभी केली होती. त्यामुळे युवराजला लोकसभेची उमेदवारी मिळेल, अशी शक्यता होती. मात्र ती मिळाली नाही. त्यामुळे नाराज झालेल्या युवराजने राजकारणापासून अलिप्त भूमिका घेत श्रीगोंद्याकडे दुर्लक्ष केले होते.
मागील नऊ वर्षे श्रीगोंद्यासह जिल्ह्यातील घडामोडीकडे युवराजने दुर्लक्ष केले होते. मात्र आता युवराजने तालुक्याकडे लक्ष द्यायला सुरवात केलेली आहे. त्यांनी तालुक्यातील राजकीयसह सामाजिक कार्यक्रमांना हजेरी लावण्यास सुरवात केलेली आहे. मात्र या कार्यक्रमांना हजेरी लावताना सध्या युवराज निवड करीत आहेत.
मोजकेच लोक त्यांच्या वाहनात बसलेले असतात. तीच व्यक्ती सांगतील तसेच कामे सध्या युवराजकडून सुरु आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.
विरोधी गटाकडून भाजप आलेल्या व्यक्तीला युवराजमुळे दोनदा संधी मिळालेली आहे. त्याच व्यक्तीच्या सांगण्यावरून युवराजचा सध्या कारभार सुरु आहे. विरोधी गटातून भाजपमध्ये आलेल्या व्यक्तीमुळे भाजपचे निष्ठावंत नाराज झालेले आहे. त्यातच युवराज त्यांना बरोबर घेऊन संपर्क अभियान राबवित असल्याने युवराजचा तालुक्यातून विरोध वाढू लागलेला आहे.
याबाबत अनेकांनी युवराजला उघड प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. परंतु ते दुर्लक्ष करीत असल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांनी आता याबाबत वरिष्ठांकडे तक्रार करण्यास सुरवात केलेली आहे. युवराज उमेदवार असतील तर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल, असा थेट सांगावाच आता भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते वरिष्ठांना पाठवत असल्याची चर्चा सध्या तालुक्यात सुरु आहे.
युवराजला पसंती नसल्याचे दिसत असूनही दाजी युवराजला सर्वाधिक पसंती असल्याच स्टंटबाजी करीत आहेत. यासाठी दाजी वाटेल ते करण्यास तयार आहे. दहा वर्षांपूर्वीही दाजीने युवराजला अशाच प्रकार हवेत ठेऊन त्यांच्या फुगा फोडला होता.
त्यामुळे आताही तशीच परिस्थिती असूनही दाजी युवराजला अंधारात ठेवत आहे. पदाधिकारीच जर युवराजला नाकारत असतील सर्वसामान्य कार्यकर्ते व मतदार युवराजला कधी स्वीकारतील, असा थेट सवाल आता भाजपच्या कार्यकर्त्यांमधून केला जात आहे.

Post a Comment