नेवाशात भाजपने नव्या चेहऱ्याला संधी द्यावी


नेवासा ः
आगामी विधानसभा निवडणुकीत नेवासा विधानसभा मतदारसंघात भाजपाचा आमदार व्हावा, अशी अपेक्षा भाजप कार्यकर्त्यांची आहे. त्यासाठी आता सर्वासमान्यांमधून नवीन चेहऱ्याला संधी द्यावी, अशी मागणी होत आहे. 



जुन्यांना डावलून आता नवीन चेहऱ्याला संधी दिल्यास नक्कीच भाजपाला यश मिळेल, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांमधून व्यक्त केली जात आहे. याबाबत नेवाशातून भाजप कार्यकर्त्यांचे शिष्टमंडळ मुंबईत जाऊन वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार आहे. या भेटीत जुन्या व सध्या उमेदवारीच्या स्पर्धेत असलेल्यांचा अहवाल आता सादर केला जाणार असल्याची चर्चा सध्या सुरु आहे.

हर्षदा काकडे यांच्या उमेदवारीमुळे शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघात चुरस वाढणार...


नेवासा विधानसभा मतदारसंघात भाजपाचा उमेदवार कोण असेल अशी चर्चा सध्या तालुक्यात सुरु आहे. तालुक्यातील व जिल्ह्यातील काही नेत्यांची नावे येथे उमेदवारी मिळावी म्हणूनच चर्चेत येत आहे. मात्र तालुक्याबाहेरील व्यक्तींच्या नावाला पक्षांतर्गत विरोध होत आहे. बाहेरी व्यक्ती आल्यानंतर लढत चुरशीची होणार नाही. त्यामुळे स्थानकि उमेदवार असणे गरजेचे आहे.


आगामी विधानसभा निवडणुकीत काही झाले तरी नेवाशाची जागा भाजपला मिळवायची असेल तर उमेदवार बदलणे गरजेचे आहे. सध्या तालुक्यात भाजपचे सचिन देसर्डा यांनाच पक्षाने उमेदवारी द्यावी, अशी अपेक्षा केली जात आहे. 

माजी आमदार बाऴासाहेब मुरकुटे यांचेही नाव चर्चेत आलेले आहे. त्यांनाही पक्षाने उमेदवारी द्यावी, अशी मागणी होत आहे. काहींनी त्यांच्या उमेदवारीसाठी वरिष्ठांच्या भेटी घेतल्याची चर्चा आहे.


माजी जिल्हा परिषद सदस्य विठ्ठलराव लंघे यांनाही भाजपने उमेदवारी द्यावी, अशी मागणी होत आहे. सध्या ते जिल्हाध्यक्ष असून त्यांचा संपर्कही चांगला आहे. असे भाजपच्या काही कार्यकर्त्यांमधून बोलले जात आहे.

भाजपमध्ये तीन ते चार गट पडलेले आहे. प्रत्येक गट आपल्या नेत्याला उमेदवारी द्यावी, अशी मागणी करीत आहे. परंतु या मतदारसंघातील जागा जिंकायची असेल तर नवीन फ्रेश चेहरा लागणार आहे. ज्याने कुकाणे गटात भरीव कामे केलेली असणारा उमेदवारच या निवडणुकीत आमदार शंकरराव गडाख यांना टक्कर देऊ शकतो. 

तसा उमेदवार भाजपच्या गोटात नाही. त्यामुळे या कुकाणे गटातील एखादा सेवानिवृत्त अधिकारी किंवा शिक्षकच किंवा त्यांच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती निवडणुकीच्या आखाड्यात उतरली तरच भाजपच्या वाट्याला ही जागा मिळेल, अशी चर्चा सध्या भाजपच्या गोटात सुरु आहे. 

शंकरराव गडाख यांचा तालुक्यातील संपर्क व कामांचा वेग पहाता त्यांना हरविणे भाजपला एक आवाहन राहणार आहे. त्यामुळे या मतदारसंघात उमेदवार देताना भाजपच्या नेत्यांची कसोटी लागणार आहे. त्यामुळे या मतदारसंघातील उमेदवाराचा शोध घ्यावा लागणार आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post