सणासुदीच्या काळात कर्मचाऱ्यांवर पैसे मागण्याची वेळ... अधिकाऱ्यांचे पगार वेळेत कर्मचार्यांवर अन्याय का...

नगर ः अधिकाऱ्यांचे पगार दर महिन्याला वेळेत होत आहेत. मात्र कर्मचाऱ्याचे पगार वेळेत होत नाही. हा प्रकार अनेकदा घडत आहेत. परंतु याकडे मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाल्याने कर्मचाऱ्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. नवरात्रोत्सवाची धामधूम सुरु आहे. या काळात कर्मचाऱ्यांचे पगार वेळेत होणे गरजेचे आहे. मात्र कर्मचाऱ्यांचे पगार उशीराने होत असल्याने कर्मचाऱ्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे अधिकाऱ्यांचे पगार झालेले आहेत. फक्त कर्मचाऱ्यांचे पगार रखडल्याची चर्चा कर्मचाऱ्यांमध्ये सुरु आहे.


आधळं दळतयं अन् कुत्र पीठ खातयं असाच कारभार सध्या जिल्हा परिषदेत गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. या कारभारात सुधारणा होण्याऐवजी त्यात आण|खीच अनागोंदी कारभार सुरु झालेला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेतील प्रशासक राज जाऊन पदाधिकारी राज लवकर यावे, अशी प्रार्थनाच आता जिल्हा परिषदेसह पंचायत समित्यांमधील कर्मचारी करू लागलेले आहे. 

प्रशासक राज काळात कामे सुकर होण्याऐवजी गुंतागुंतीची होत असून कर्मचाऱ्यांना सर्वाधिक त्रास सहन करावा लगात आहे. कर्मचाऱ्यांचे पगार उशिराने होत असून अधिकाऱ्यांचे मात्र ठरलेल्या तारखेलाच होत असल्याने कर्मचाऱ्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. अधिकारी तुपाशी अन् कर्मचारी उपाशी असे कर्मचाऱ्यांमधून उपहासात्मक म्हटले जात आहे.

जिल्हा परिषदेत प्रशासक राज येऊन अडीच वर्षापेक्षा अधिक कालावधी लोटला आहे. या कालावधीत जिल्ह्यात विविध कामे मार्गी लागणे गरजेचे होते. परंतु या अडीच वर्षापेक्षा नवीन अशीच काही कामे झालेली नाही. उलट आहे तीच कामे प्रलंबित राहिलेली असून सर्वसामान्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून अशा परिस्थितीत वाढ होत चालली आहे. त्यामुळे प्रशासक राज हटवा अन् पदाधिकारी राज आणा, असेच आता बोलले जात आहे.

प्रशासक राज काळात जिल्हा परिषदेतील कामे वेगाने होणे अपेक्षीत होते. मात्र ही कामे वेगाने झालेली नाहीत. या जबाबदार प्रशासक राज असल्याचे कर्मचाऱ्यांमधून बोलले जात आहे. प्रशासक राज काळात काही कर्मचाऱ्यांनी चलती असून ते ठरावीक अधिकाऱ्यांच्या मागे पुढे कायम रहात असून कामातून सवलती मिळवित आहेत. या ठरावीक कर्मचाऱ्यांच्या या पध्दतीवर सर्वच कर्मचारी नाराज असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अशा लोकांना आवरावे, अन्यथा या विरोधात आता काहीजणांनी विभागीय आयुक्तांकडे तक्रारी करण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रशासक राज आल्यापासून कर्मचाऱ्यांचे पगार वेळेत झालेले नाही. नेहमीच हे पगार अवेळी होत आहे. त्यामुळे सर्वसामान्य कर्मचारी अडचणीत आलेले आहेत. काहींना प्रशासनातील काहींच्या चुकीचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. काहींनी आर्थिक झळही सोसावी लागत आहे. फक्त कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबतच असे घटत असून अधिकाऱ्यांचे पगार निश्चित वेळेत होत असल्याचे कर्मचाऱ्यांमधून बोलले जात आहे. 

कर्मचाऱ्यांचे पगार वेळेत करून मग अधिकाऱ्यांनी आपले पगार घेणे सर्वांना अपेक्षीत आहे. मात्र अधिकारी ठरलेल्या वेळेत पगार घेत असून कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत उदासिनता बाळगत असल्याने कर्मचाऱ्यांमधून अधिकाऱ्यांविषयी नाराजी व्यक्त केली जात आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post