नगर ः जिल्हा बॅंकेत सुरु असलेल्या कारभाराचा आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांच्या मतावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तूर्त तरी जिल्हा बॅंकेचे अध्यक्षपद त्वरित बदलण्यात यावे, अशी मागणी होत आहे.त्यामुळे अध्यक्षपद बदलाच्या हालचाली सुर कराव्यात, अशी मागणी भाजप कार्यकर्त्यांमधून होत आहे.
जिल्हा बॅंकेतील नोकर भरती प्रकरणावरून सध्या बॅंकेच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली जात आहे. ही नाराजी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपसह महायुतीतील इतर पक्षांना डोकेदुखी ठऱणारी आहे. त्यामुळे बॅंकेत बदलाच्या हालचाली कराव्यात, अशी मागणी जोर धरत आहे याबाबत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे याबाबत तक्रार करण्यात येणार आहे, अशी चर्चा सध्या कार्यकर्त्यांमध्ये सुरु आहे.
जिल्हा बॅंकेतील नोकरभरतीची प्रक्रिया सुरु झाल्यापासूनच बॅंकेतील कारभार चव्हाट्यावर येऊ लागलेला आहे. यावर आता विरोधकांकडूनही टीकेची झोड उठविली जात आहे. विरोध आक्रमक होत असतानाच भाजपचे कार्यकर्तेही आता नाराजी व्यक्त करू लागलेले आहे. बॅंकेतील कारभारात काही अंशी बदल करण्यात यावा, अशीच मागणी व्यक्त केली जात आहे.
बॅंकेच्या कारभाराचे भांडवल आता विरोधक करू लागले असून महायुतीला कोंडीत पकडण्याचे काम केले जात आहे. यासाठी तरुणांनीही आक्रमक भूमिका घेणे गरजेचे आहे. बॅंकेतील कारभारावर संचालक मंडळासह अध्यक्षांना सर्वांनी जाब विचारणे गरजेचे आहे.

Post a Comment