सावधान आता जनावरांच्या चोर्या सुरू झाल्यात....

श्रीगोंदा : श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव  छत्तीसे वस्ती येथील मनोज छत्तीसे यांच्या वस्तीवर काल मध्यरात्री च्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी घराचा दरवाजा उघडून कपाटातील रोख १०हजार व गोठ्यातील दोन बोकडांची धाडशी चोरी केल्याची घटना घडली आहे. 


आढळगाव येथील छत्तीसे वस्ती येथील रहिवासी मनोज छत्तीसे यांच्या वस्तीवर दि ८च्या मध्यरात्री दीड ते दोन वाजेच्या दरम्यान मनोज यांचे बंधू अमर छत्तीसे हे ज्या खोलीत झोपले होते. 

त्या खोलीला बाहेरुन कडी लावून शेजारील खोलीतील उचकापाचक करून कपाटातील रोख १० हजार रुपये चोरट्यांनी चोरले व घरातील सामानाची उचकापाचक करून गोठ्यात बांधलेल्या शेळ्यांपैकी दोन बोकडांची चोरी करण्यात आली. 

पहाटे मनोज यांच्या आई बाथरूम साठी दरवाजा उघडत असताना बाहेरुन कडी लावल्याचे लक्षात आले. त्यानंतर मनोज यांना आवाज देवुन कडी उघडण्यास सांगितले त्यानंतर चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत श्रीगोंदा पोलीसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

आढळगाव परिसरात चोरी झाल्यानंतर अमर छत्तीसे यांनी याबाबत रात्री २चे सुमारास पोलीस आपातकालीन सेवेच्या डायल ११२ वरती अनेकदा संपर्क केला तरीही त्यांना त्यावेळी कोणत्याही प्रकारची मदत मिळाली नाही. 

शेवटी कंटाळून त्यांनी पोलीस ठाण्याच्या दूरध्वनी वरती संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता तो फोन कोणीही उचलत नसल्याने पोलिसांची तत्परता किती आहे. हे दिसून येते असेही त्यांनी सांगितले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post