नेवासा ः माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी मुळा व ज्ञानेश्वर कारखान्याच्या निवडणुकांमध्ये सेटिंग केल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. त्याला मुरकुटे यांनी सडेतोड उत्तरे अनेकदा दिलेले आहे. परंतु त्यांनी आज शनिदेवावर हात ठेऊन आपण कोणत्याच निवडणुकीत सेटिंग केलेली नसून आपण जनतेशी प्रामाणिक वागलो आहे, अशी शपथ खाऊन सांगितले. त्यामुळे विरोधक निरुत्तर झालेले आहेत.
मुळा कारखाना व ज्ञानेश्वर कारखाना निवडणुकीत तसेच शनैश्वर देवस्थानच्या विश्वस्त निवड प्रक्रियेत माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी सेटिंग केल्याचा आरोप त्यांच्या विरोधकांनी केला होता. त्यांनी शनिदेवासमोर येऊन उत्तर द्यावे, असे आवाहनही विरोधकांनी दिले होते.
विरोधकांचे आवाहन बाळासाहेब मुरकुटे यांनी स्वीकारत आज शनिवारी शनिशिंगणापूर येथे येऊन शनिदेवाचे दर्शन घेतले. या वेळी त्यांनी आपण जनतेच्या विश्वासाला पात्र आहे. मी शनिदेवाची शपथ खाऊन सांगतो, मी कोणचाही विश्वासघात केलेला नाही. म कोणत्याच निवडणुपकीतच सेटलमेंट केलेली नाही. विरोधख बिनबुडाचे आरोप करीत आहेत.
कोणला काही विचारयचे असेल तर त्यांनी प्सश्न विचारावे, असे आवाहन मुरकुटे यांनी या वेळी विरोधकांना दिले. या वेळी विरोधक उपस्थित राहून प्रश्न विचारतील, असे सर्वांना वाटत होते. मात्र एकही जण यावेळी उपस्थित नव्हता. त्यामुळे विरोधकांचे आरोप हे बिनबुडाचे आहे, अशीच चर्चा या वेळी उपस्थितांमध्ये सुरु होती.
चुकीचे काम मुरकुटे यांनी केले असते तर त्यांनी शनिदेवावर हातठेऊन शपथ खालली नसती. त्यामुळे विरोधकांनी या पुढे आरोप करताना काळजी घ्यावी, अशीच अपेक्षा या वेळी उपस्थितांनी व्यक्त केली. दिवसभर सध्या याच शपथेची चर्चा तालुक्यात सुरु होती.
Post a Comment