पारनेर : कान्हूरपठार व परिसरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावत असून महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरविण्यासाठी आपण विधानसभेत आवाज उठवून शास्वत पाणी योजना माग लावण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावू, अशी ग्वाही महाविकास आघाडीच्या उमेदवार राणी लंके यांनी दिली.
लंके यांच्या प्रचारार्थ आयोजित बैठकीसाठी राणी लंके या कान्हूर पठारमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांचे मोठया जल्लोषात स्वागत करण्यात आले.
लंके म्हणाल्या, सन २०१९ मध्ये खा. नीलेश लंके यांना मतदारांनी मोठया मताधिक्क्याने विधानसभेत पाठविल्यानंतर त्यांनी त्या पदाला न्याय दिला. मतदारसंघात हजारो कोटी रूपयांची कामे माग लावली.
कोणत्याही लोकप्रतिनिधीने मतदार संघात साडेचार वर्षांच्या कालखंडात इतक्या मोठया प्रमाणात विकास कामे माग लावलेली नाहीत. प्रत्येक गावाला विकास कामे देण्याचा प्रयत्न केला गेला.
विकास कामे देताना कोणताही राजकीय अभिनिवेश न ठेवता कामे मंजूर करण्यात आली. असे असतानाही विरोधक विकास कामांबाबत चर्चा करतात ती हस्यास्पद आहे.
राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनीच लोकसभा निवडणुकीदरम्यान खा. लंके यांनी मतदारसंघासाठी किती निधी खेचून आणला याबाबत सांगितलेले असताना विकास कामांबाबत स्वतः कडे सांगण्यासारखे काही नसताना नागरीकांची दिशाभूल करण्याचे काम विरोधक करत असल्याचे लंके यांनी सांगितले.
या वेळी चंद्रभान ठुबे, किरण ठुबे, बाबासाहेब घुमटकर, प्रसाद नवले, धनंजय ठुबे, शिवाजी व्यवहारे, सरपंच संध्या ठुबे, माजी सरपंच गोकूळ काकडे, मा. उपसरपंच सागर व्यवहारे, विशाल लोंढे, वैभव साळवे, बापू चत्तर, श्रेयश घोडके, तुषार सोनावळे, सुरज नवले, गणेश तांबे, ज्ञानेश्वर गायखे, श्रीकांत ठुबे, राणी घुमटकर, गीतांजली ठुबे, सुशिला ठुबे, देवराम टेकाडे, आनंदीबाई टेकाडे, अनिता घोडके, लता ठुबे,राजाराम ठुबे, भोमा ठुबे, गणेश गायखे आदी उपस्थित होते.
लंके यांचे आगमन झाल्यानंतर त्यांची मुख्य बाजारपेठेतून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. ठिकठिकाणी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात येत होता. महिलांकडून त्यांचे औक्षण करण्यात येत होते. महिला तसेच कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून ही प्रचाराची सभा नाही तर विजयाची सभा असल्याचा अभास होत असल्याचे लंके यांनी सांगितले.
Post a Comment