अकोले : महाविद्यालयातील प्राध्यापकाने विद्यार्थिनीबरोबर अश्लील चॅटिंग केल्याचे उघड झाले आहे. पीडित विवाहित विद्यार्थिनीने प्रा. यासीन गुलाबभाई सय्यद व त्याची पत्नी दिलशान सय्यद या दोघांविरुद्ध अकोले पोलिस ठाण्यात मंगळवारी फिर्याद दिल्याने प्राध्यापकाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोमवारी या प्रकरणातून अकोलेत बंद व रास्ता रोको आंदोलन छेडत आले होते. उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांनी अकोलेत भेट दिली. दिवसभर विविध संघटनांचे कार्यकर्ते पोलिस ठाण्याच्या परिसरात बसून होते.
विद्यार्थिनीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मी ऑनलाईन मोबाईलवर शिक्षण घेत होते, प्रा. यासीन गुलबभाई सय्यद याचे जून- जुलैच्या दरम्यान मोबाईलवर मॅसेज येऊ लागले.
मी जर घरात कुणाला सांगितले तर माझे कॉलेज बंद होईल, या भीतीने मी हा प्रकार कुणाला सांगितला नाही. सय्यद याने बळजबरीने जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार सय्यदच्या पत्नीस समक्ष भेटून सांगितला.
पत्नीनेही धमकावले. हा प्रकार पीडितेच्या पतीला समजला. ते सय्यद यास विचारणा करण्यासाठी कॉलेजमध्ये गेले. सय्यद याने पीडितेचा पती व इतरांवर शाही फेकून मारहाण केली, असे फिर्यादित म्हटले आहे.
Post a Comment