नागपूर : महायुतीमध्ये कुठलेही मतभेत नाहीत. आम्ही सर्वजण एकत्र निर्णय घेणार आहोत, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले.
एकनाथ शिंदे हे नाराज आहेत, अशी चर्चा सुरू होती. पण एकनाथ शिंदे यांनी आज पत्रकार परिषद घेत आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली.
नागपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाचे विधान केले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, 'आम्ही सगळे एकत्रित आहोत.
शिंदेसाहेब असतील, अजितदादा असतील किंवा मी. महायुतीत कुठलेही मतभेद नाहीत. तसंच, महायुतीमध्ये आमच्या सगळ्यांचे मत वेगळे कधी राहिले नाही. नेहमी आम्ही एकत्रच निर्णय घेतले आहेत, असे देखील त्यांनी सांगितले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आम्ही निवडणुकीपूर्वी सांगितलं होतं की सगळे निर्णय सोबत बसून होतील. पक्षश्रेष्ठी आमच्यासोबत बसून निर्णय घेतील त्याप्रमाणेच सर्व निर्णय होतील.
कोणाच्या मनात काही किंतू परंतु असेल तर आज एकनाथ शिंदे यांनी तो देखील दूर केला आहे. पुढच्या प्रक्रियेसाठी पक्ष श्रेष्ठीसोबत आमची बैठक होणार आहे.
या बैठकीनंतर योग्य तो निर्णय घेऊ. तसंच, सरकार स्थापनेबाबत बोलताना थोडी वाट पाहा सत्ता स्थापन होईल, असे देखील त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
Post a Comment