शिकवणीसाठी जात असलेल्या विद्यार्थ्याचे अपहरण...

पुसद : खासगी शिकवणीसाठी जात असलेल्या इयत्ता दहावीतील एका विद्यार्थ्याला गुंगीचे औषध देऊन तीन अज्ञात आरोपींनी अपहरण केले.


ही घटना, सोमवारी सायंकाळी येथील बसस्थानक ते कारला रोडवर घडली.  संकेत संजय देवसरकर (१६, रा. मोतीनगर, पुसद) असे अपहरण झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो सायंकाळी शिकवणीसाठी जात होता.

वाटेत सायकल पंक्चर झाल्याने त्याने ऑटोरिक्षाची मदत घेतली. ऑटोतील दोन प्रवाशांनी गुंगीचे औषध लावलेला रुमाल संकेतच्या नाकाला लावून त्याला बेशुद्ध केले. 

पुढे त्याला आरोपींनी एका कारमधून नांदेडला नेले. नांदेड ते लातूर मार्गावर लघुशंकेसाठी कार थांबली व दोन्ही व्यक्ती खाली उतरल्या असता संकेत शुद्धीवर आला. 

आपले अपहरण झाल्याचे त्याच्या लक्षात येताच त्याने  नांदेडमधील असना चौकाकडे पळ काढला. स्वतःची सुटका केली. पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post