केडगावमध्ये एकावर चाकू हल्ला...

अहिल्यानगर : केडगाव येथील किरकोळ कारणातून एकावर चाकूने वार केल्याची घटना सोमवारी (ता. २५) रात्री घडली. 


सुनील अंबादास पवार (वय ३५, रा. तिरंगा चौक, वैष्णवनगर, केडगाव) असे चाकू हल्ला झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. 

याप्रकरणी भोऱ्या (पूर्ण नाव माहीत नाही, रा. वैष्णवनगर, • केडगाव) याच्याविरोधात कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

फिर्यादी घरी जात असताना समोरून आरोपी आला. त्याने तुझ्या पोराने काल चारचाकीचा दरवाजा : उघडा ठेवल्याने मी त्यावर आदळलो, असे म्हणत फिर्यादीच्या पोटावर व खांद्यावर चाकूने वार केले. 

त्यात फिर्यादी जखमी झाले, असे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post