पाथर्डी : शेवगाव-पाथर्डी मतदारसंघात झालेल्या तिरंगी लढतीत भाजपा महायुतीच्या उमेदवार आमदार मोनिका राजळे यांनी १९ हजार ४३ हजारांचे मताधिक्य घेत विजयाची हॅट्ट्रिक केली.
या मतदारसंघात गेल्या पन्नास वर्षांत तिसऱ्यांदा निवडून येण्याचा बहुमान कोणत्याही उमेदवारांना मिळाला नाही. भारतीय जनता पक्षाने आता मोनिका राजळे यांना आता मंत्रिपदाची संधी द्यावी अशी मागणी कार्यकर्त्यांमधून होत आहे. राजळे यांनी केलेल्या कामाची दखल पक्षाने घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
राजळे यांनी मात्र तिसऱ्यांदा विजयी होत विरोधकांना धोबीपछाड दिली आहे. मतदारसंघात प्रचाराच्या कालावधीत महायुतीच्या मोनिका राजळे, महाविकास आघाडीचे प्रताप ढाकणे तसेच अपक्ष चंद्रशेखर घुले व हर्षदा काकडे अशी चौरंगी लढत झाली.
आरोप-प्रत्यारोप, नेत्यांच्या गाजलेल्या सभा, कापूस, सोयाबीनचे दर, विकासाचे प्रश्न, जातीय राजकारण आदी मुद्दे प्रचारात चांगलेच गाजले. राजळे, घुले, ढाकणेंनी सुरुवातीपासून प्रचारात आघाडी घेत मतदारसंघातील गावन् गाव पिंजून काढले होते. त्यामुळे शेवटपर्यंत तीनही उमेदवारांनी एकमेकांसमोर मोठे आव्हान उभे केेलेले होते.
राजळे यांना एकूण ९९ हजार ७७५ मते मिळाली. महाविकास आघाडीचे उमेदवार अॅड. प्रताप ढाकणे हे ८० हजार ७३२ मते घेऊन दुसऱ्या तर अपक्ष उमेदवार चंद्रशेखर घुले हे ५७ हजार ९८८ मते घेऊन तिसऱ्या स्थानी राहिले. अपक्ष काकडे यांना एकूण १२ हजार २३२ मते मिळाली.
Post a Comment