राहाता : आमच्या हातात सत्ता द्या शेतकऱ्यांच्या शेतात पाणी पोहोचवल्याशिवाय राहणार नाही. अशी ग्वाही काँग्रेसच्या उमेदवार प्रभावती घोगरे यांनी दिली.
राहाता तालुक्यातील आडगाव, पिंपरी लोकई, केलवड, दहेगाव, पिंपळस व पिंपरी निर्मळ या गावांमध्ये घोगरे यांचा प्रचार दौरा सुरू होता. शुक्रवारी सायंकाळी पिंपरी निर्मळ येथे सभा पार पडली. यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी काँग्रेस तालुकाध्यक्ष राजेंद्र निर्मळ, ज्ञानेश्वर वर्षे, गंगाधर गमे, उत्तम घोरपडे, श्रीकांत मापारी आदी उपस्थित होते.
घोगरे म्हणाल्या, निळवंडेचे धरण तयार झाले. उजवा डावा कालवा तयार झाला. परंतु काही कालव्यांची तसेच पोट साऱ्यांची कामे अपूर्ण आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात ५५ वर्षांपासून पाणी पोहोचलेच नाही.
Post a Comment