अहिल्यानगर : माजी महापौर संदीप कोतकर यांच्या संभाव्य उमेदवारीमुळे चर्चेत आलेल्या नगर शहर मतदारसंघात आमदार संग्राम जगताप यांनी केडगावमधून २ हजार ९७३ मतांची निर्णायक आघाडी घेतली.
नगर शहर मतदारसंघाच्या निवडणुकीचे बिगुल वाजले व माजी महापौर संदीप कोतकर यांच्या स्पंदन प्रतिष्ठानने नगर शहरातून गणेश विसर्जन मिरवणूक काढत शक्तिप्रदर्शन केले होते. हे शक्तिप्रदर्शन विधानसभा लढवण्यासाठी होते हे निश्चित झाले.
यानंतर उद्योजक सचिन कोतकर यांनी केडगावमध्ये शक्तिप्रदर्शत करीत निवडणूक लढविण्याबाबत मेळावा घेतला. या मेळाव्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले होते.
कोतकर समर्थकांनी निवडणूक लढवण्यासाठी हिरवा कंदील दाखवताच सचिन कोतकर यांनी नगर शहराच्या मैदानात दंड थोपटले. कोतकर यांना महाआघाडीकडून तुतारी किंवा मशाल मिळेल, अशी शहरात चर्चा सुरू झाली. परंतु ऐन वेळी उमेदवारी त्यांना मिळाली नाही.
शेवटी माजी महापौर संदीप कोतकर यांची एका प्रकरणात जिल्हा बंदी शिथिल झाली. ते नगरमध्ये आले, त्यावेळी जंगी स्वागत झाले. मात्र, एका प्रकरणात त्यांची जिल्हाबंदी नाकारण्यात आली.
त्यातच मिरवणुकीत झालेल्या गडबडीवरून २०० कोतकर समर्थकांवर गुन्हे दाखल झाले, अन् त्यांच्या उमेदवारीची आशा मावळली.
त्यानंतर कोतकर समर्थकांनी अभिषेक कळमकर यांना साथ देण्याचा निर्णत घेतला. त्यांनाच मतदान करण्याचे आवाहन केले.केडगावमधून काय होतेय, या टेन्शनमध्ये असलेल्या जगताप समर्थकांना यामुळे दिलासा मिळाला.
Post a Comment