अहिल्यानगर : जिल्हात महायुतीने घवघवीत यश मिळविले आहे. या यशात माजी खासदार डाॅ. षुजय विखे यांचा मोलाचा वाटा आहे. विखे यांच्या नियोजनामुळेच पारनेर व संगमनेरची जागा महायुतीला जिकंता आली आहे. तसेच जिल्ह्यातील इतरही उमेदवारांच्या विजयात विखे यांचा वाटा आहे.
जिल्ह्यात महाविकास आघाडी भूईसपाट झालेली आहे. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे व डाॅ. सुजय विखे यांनी जिल्ह्यातील सर्वच मतदार संघात सभा घेऊन महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले.
संगमनेर विधानसभा मतदारसंघात सुजय विखे यांनी सर्वाधिक लक्ष दिले. तेथे त्यांनी कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या. तसेच सभा मोठ्या प्रमाणात घेऊन त्यांनी विजयाची पायाभरणी केली. त्यामुळेच संगमनेरमध्ये अमोल खताळ यांचा विजय झालेला आहे.
पारनेरमध्ये लक्ष दिले. परंतु त्यांनी बाहेरूनच सर्वाधिक पारनेरमधील सूत्रे हलविली. त्याचा फायदा काशिनाथ दाते यांना झाला. परिणामी दाते विजयी झालेले आहेत.
Post a Comment