राहुरी : विरोधक हे फक्त भाषणबाजी करतात. प्रत्यक्षात त्यांचे काम शून्य आहे. मतदारसंघामध्ये दहा वर्षांत त्यांनी केलेले एक तरी भरीव कले नाही, असा आरोप प्राजक्त तनपुरे यांनी शिवाजीकर्डिले यांचे नाव घेता त्यांच्यावर केला आहे.
आमदार तनपुरे यांचा कनगर येथे प्रचार दौरा होता. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी सरपंच दत्तात्रय गाढे होते.
तनपुरे म्हणाले की, कनगर गावाचे आणि माझे एक वेगळे भावनिक नाते आहे. उद्घाटन करण्यापेक्षा काम करण्यात मला जास्त आवड आहे.
राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येणारच आहे. लोकसभेच्या निकालाची पुनरावृत्ती विधानसभेतही दिसणार आहे. कोणत्याही परिस्थितीत राज्यात सत्तांतर घडणार आहे. यामध्ये युवक व महिला सगळे जण अग्रेसर असल्याचे ते म्हणाले.
Post a Comment