श्रीरामपूरमध्ये बिबट्याचा धुमाकूळ...

श्रीरामपूर :  शहराजवळ असलेल्या सुभाषवाडी परिसरामध्ये बुधवारी सायंकाळी बिबट्याने धुमाकूळ घातला. बिबट्याच्या हल्यात चारजण जखमी झालेले आहेत. 


बिबट्याने संदीप भोसले नावाच्या व्यक्तीवर हल्ला केला. यामध्ये या व्यक्तीच्या पायाला चावा घेतल्याने जखम झाली आहे. एका लहान मुलावर देखील हल्ला करत त्याला नख मारले. 

एका महिलेवरही बिबट्याने हल्ला केला आहे. ही घटना श्रीरामपूर शहराजवळील विद्यानिकेतन शाळेपासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या सुभाषवाडी येथे घडली आहे.

याच वेळी थोड्या अंतरावर असलेली नवलेवस्ती जवळील नवले यांच्या मुलीवर पण बिबट्याने हल्ला केला आहे. त्यामुळे सुभाषवाडी व नवलेवस्ती जवळील मोठे घबराटीचे वातावरण तयार झाले आहे.

त्यामुळे येथील नागरिकांनी तात्काळ पिंजरा लावण्याची मागणी केली आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post