उत्तरचा मनमानी कारभार...नको तो विभाग म्हणण्याची वेळ...

अहिल्यानगर : जिल्हा परिषदेच्या उत्तर विभागात सध्या मनमानी कारभार सुरु आहे. या कारभाराला आता कर्मचारी कंटाळलेले आहे. एका प्रकरणाबाबत चौकशी करण्याचा आदेश वरिष्ठांनी दिला आहे, अशी चर्चा सध्या सुरु आहे.


जिल्हा परिषदेचा बांधकाम विभागाचा कारभार नेहमीच चर्चेत असतो. यामध्ये सध्या उत्तर विभागाने आघाडी घेतलेली आहे. उत्तर विभागात कर्मचारीच एकमेकांच्या विरोधात कारवाई करीत आहे. हा प्रकार सध्या मोठ्या प्रमाणात सुरू असल्याची चर्चा जिल्हा परिषदेत सुरू आहे.

जिल्हा परिषदेच्या उत्तर विभागात सध्या कर्मचार्यांमध्ये तीन ते चार गट पडलेले असून हे गट एकमेकांना अडचणीत आणण्यासाठी मदत करीत आहेत. काहीजण मदत करण्याच्या निमित्ताने स्वतन:चे हीत साधून घेत आहे. 

ही बाब थेट वरिष्ठांच्या लक्षात आलेली आहे. त्यावरून या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश संबंधितांना दिल्याची चर्चा आहे. हा प्रकार काय त्याची अनेकजण माहिती घेत आहेत.

काही कर्मचार्यांना त्यांचे सहकारी जाणूनबुजून अडचणीत आणत आहेत. प्रशासन व इतर कर्मचारी असा वाद उफळलला आहे. यामध्ये कर्मचार्यांचे आर्थिक नुकसान करण्याचा प्रकार सुरु झालेला आहे. यावरून कर्मचार्यांमध्ये वादावादी होत असल्याची चर्चा जिल्हा परिषदेच्या वर्तुळात आहे.

विशेष म्हणजे ज्या कर्मचार्यांकडून इतरांना त्रास होत आहे. त्या कर्मचार्यांच्या विरोधात या अगोदर अनेक तक्रारी आहे. त्यांच्या बाबात सर्वसाधारणसभेत चर्चा झालेली असून तत्कालीन सदस्यांनी कारवाईची मागणी केलेली आहे. अशाच कर्मचार्यांकडून इतरांना त्रास देण्याचे काम सुरु असल्याची चर्चा सध्या जिल्हा परिषदेत सुरु आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post