मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला आहे. या निवडणुकीत महायुतीला तब्बल 230 जागांवर यश आलं आहे.
महाविकास आघाडीला अवघ्या 46 जागांपर्यंत मजल मारता आली आहे. महाविकास आघाडीत ठाकरे गटाला सर्वाधिक 20 जागांवर यश मिळाले.
काँग्रेसला 16 आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला 10 जागांवर यश आले आहे. या पराभवानंतर आता विरोधकांच्या महाविकास आघाडीत फूट पडते की काय? अशी चर्चा आता रंगू लागली आहे.
कारण ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी याबाबत सूचक वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
ठाकरे गटाने स्वतंत्र लढलं पाहिजे, असे कालच्या बैठकीत प्रत्येकाचा सूर असल्याचे अंबादास दानवे यांन म्हटले आहे. कार्यकर्त्यांनी स्वबळावर लढण्याच्या भावना व्यक्त केल्याचेही दानवे म्हणाले आहेत.
Post a Comment