नेवासा : तालुक्यात गेला काही दिवसांपासून बेकायदा सावकारी जोमात सुरू झाली आहे. कोरोना काळात अनेकांचे अनेकांचे व्यवसाय अडचणीत आलेले आहे.
काहींचे हातचे कामही गेलेले आहे. त्यामुळे आर्थिक अडचणीत आलेल्यांनी सावकारांकडून कर्ज घेतलेले आहे. या सावकारांच्या अरेरावीला मात्र अनेक जण वैतागले आहेत.
नेवासा तालुक्यातील फक्त एकच अधिकृत सावकार आहे. मात्र कुकाण्यासह परिसरातील गावांमध्ये काही जण बेकायदा सावकारीचा व्यवसाय करीत आहेत. या सावकारांच्या त्रासाला अनेक जण कंटाळले आहेत.
सावकारीचा व्यवसाय करणारे काही जण सरकारी नोकरीत आहे. ते हा व्यवसाय करीत असल्याची चर्चा सुरू आहे. या चर्चेत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे.
कोरोना काळात अनेक गावातील लोक आर्थिक अडचणीत आलेले आहेत. या अडचणीतून मार्ग काढत अनेकांनी आपला प्रपंचाचा गाडा हाकला आहे.
या काळात आर्थिक परिस्थितीवर मात करण्यासाठी काहींनी खाजगी सावकाराकडून कर्ज घेतलेले आहे. कर्जाची फेड ही सुरू आहे. सावकारांची मात्र अरेरावी सुरु आहे.
बेकायदा सावकारी विरोधात तक्रारी करायच्या असतील तर नेमके कोणाकडे करायची असा प्रश्न सर्वसामान्यांना नेहमीच पडत असतो. त्यामुळे आता जिल्हा उपनिबंध कार्यालयाने प्रत्येक गावागावात प्रबोधन करणे गरजेचे आहे.
शाळा महाविद्यालयाच्या माध्यमातून हे जन प्रबोधन होणे गरजेचे आहे. त्यामुळेचबेकायचा सावकारीला लगाम लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
या सावकारांची मोठ्या लोकांबरोबर उठ बस असते. ही मंडळी अनेकांना जेवनावळी करते. कधी अहिल्यानगरमधील मंडळी नेवाशात बोलविली जाते. तर कधी हेच सावकार शहरात जाऊन त्यांना पार्ट्या करीत आहेत.
सावकारकी करणारे बाहेरून आलेले असून मामांसह इतरांच्या जोरावर लोकांना लुबाडणूक करीत आहे. अशी चर्चा सध्या तालुक्यात सुरु आहे. या चर्चेला पूर्ण विराम देण्याची गरज आहे.
जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने तालुक्यातील शाळांमध्ये जनजागृती मोहीम राबविणे गरजेचे आहे. तालुक्यातील सर्व शाळांमधील शिक्षकांचा त्यात सहभाग घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Post a Comment