मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे एसटी कामगारांची दिवाळी भेटीची रक्कम रखडली होती; मात्र आता आचारसंहिता संपताच दिवाळी भेटीचा मार्ग मोकळा झाला आहे. एसटी कामगारांना शुक्रवारी (ता. २९) दिवाळी भेटीची रक्कम अदा केली जाणार आहे.
एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांची मान्यताप्राप्त एसटी कामगार संघटनेसोबतच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला.
यावेळी एसटी महामंडळाचे वित्तीय सल्लागार गिरीश देशमुख, महामंडळाचे महाव्यवस्थापक मोहनदास भरसट, मुख्य कामगार अधिकारी राजेश कोनावडेकर, वाहतूक उपमहाव्यवस्थापक चेतन हसबनीस आदी उपस्थित होते.
Post a Comment