राहुरी : मोमीन आखाडा परिसरात पतीच्या मारहाणीत जखमी झालेल्या पत्नीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पत्नीच्या गळ्यावर चाकूने वार करून डोक्यात दगडाने मारहाण करून पती पसार झाला होता.
ही घटना सोमवारी (ता. २५) सायंकाळच्या दरम्यान घडली होती. आरोपी नारायण हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन कायमच तिच्याशी वाद घालत होता.
मारहाणीत जखमी झालेली पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली असताना आरोपी पती घराला बाहेरून कडी लावून पसार झाला होता. मुले शाळेतून घरी आल्यावर त्यांनी घराची कडी उघडून पाहिले असता मंदा चव्हाण या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. त्यांच्यावर पुणे येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू होते.
जखमी मंदा चव्हाण यांचा भाऊ भगवान दादाराव जाधव यांच्या फिर्यादीवरून आरोपी नारायण चव्हाण, हरिभाऊ चव्हाण, रुख्मिनी चव्हाण यांच्यावर ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
Post a Comment