कराड : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या रोहित पवार यांच्या पाया पडल्याचा व्हीडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्याची चांगलीच चर्चा सुरु आहे.
कराड (ता. सातारा) येथे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या समाधिस्थळावरून उपमुख्यमंत्री अजित पवार चालले होते. त्यावेळी अजित पवार व आमदार रोहित पवार समोरासमोर आले.
यावेळी अजित पवार म्हणाले, तू थोडक्यात वाचला, माझी सभा झाली असती तर काय झाले असते. चल पाया पड, असे रोहित पवार यांना म्हणताच ते पाया पडले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
या व्हीडीओची जिल्ह्यात चांगलीच चर्चा सुुरु आहे. या चर्चेत सध्या चांगलीच भर पडली आहे. या व्हीडीओ जामखेड तालुक्यातील शिंदे गटातून नाराजी व्यक्त केली जात आहे.
Post a Comment