पारनेर : पारनेर हा पुरोगामी विचारांचा सुसंस्कृत तालुका आहे. हा तालुका आता एका चांगल्या माणसाच्या हातात आल्यामुळे निश्चितच विकास होणार आहे. तो विकास करण्यासाठी आम्ही काशिनाथ दाते यांच्या पाठीमागे सक्षमपणे उभे राहू, अशी ग्वाही पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
पारनेर विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार काशिनाथ दाते यांनी सोमवारी मुंबई येथे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेतली. यावेळी विखे पाटील यांनी आमदार दाते यांना पेढा भरवून शुभेच्छा दिल्या. यावेळी ते बोलत होते.
दाते यांनी पारनेर मतदारसंघात मिळविलेले यशही अविस्मरणीय आहे. दाते यांच्या समवेत भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य विश्वनाथ कोरडे, वसंत चेडे, जिल्हा बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड, भाजप जिल्हा उपाध्यक्ष सुभाष दुधाडे, लाडके बहीण योजना समितीचे तालुकाध्यक्ष सुनील थोरात, सरपंच मनोज मुंगसे आदी उपस्थित होते.
विखे म्हणाले, पारनेर तालुक्यावर विखे कुटुंबाचे विशेष प्रेम आहे. तालुक्याच्या विकासासाठी नेहमीच कटिबद्ध असून दाते यांच्या माध्यमातून आता तालुक्यात विकासकामांना भरीव निधी देणार आहे. सुपा येथे एमआयडीसीच्या माध्यमातून स्थानिक युवकांना रोजगार उपलब्ध करून देणार आहे, असे ते म्हणाले.
Post a Comment