अहिल्यानगर : तांत्रिक अडचणीमुळे या पंचवार्षिकला संदीप कोतकर यांना विधानसभेची उमेदवारी करता आलेली नाही. परंतु ते उमेदवारी करणाऱ्या शक्यतेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. त्यांनी उमेदवारी केली नसली तरी त्यांचा कौल नेमका कोणाला राहणार या विषयी चर्चा सुरू आहे.
अहिल्यानगर तथा अहमदनगर मतदारसंघ विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी कडूनअभिषेक कळमकर व महायुतीकडून आमदार संग्राम जगताप हे उमेदवारी करत आहेत. या दोघांमध्ये सरळ लढत होत आहे. पहिले अहिल्यानगर शहरामध्ये आता प्रचार जोमाने सुरू आहे.
आमदार संग्राम जगताप यांना लवकरच उमेदवारी जाहीर झाल्यामुळे त्यांनी मतदारसंघात प्रचारात जोरदार आघाडी घेतल्याचे चित्र दिसून येत आहे. प्रचाराचे त्यांच्या फेर्या शहरात पूर्ण झाल्याचे चित्र दिसत आहे.
अभिषेक कळमकर यांनीही जनसंपर्क अभियान राबवले आहे. चौकसभा घेऊन ते आपला अजेंडा मतदारांसमोर मांडत आहे. त्यांच्या प्रचारचांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.
शहरात दोन्ही उमेदवारांनी टीका टिपणी करण्याऐवजी त्यांनी मतदारांच्या गाठीभेटी घेण्यावर भर दिला आहे. दोन्ही उमेदवार आता शेवटच्या टप्प्यात एकमेकांवर काय आरोप करतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
दोन्ही उमेदवार आपापल्या परीने प्रचारात व्यस्त असले तरीमहापौर संदीप कोतकर यांचा कौल नेमका कोणाच्या बाजूने राहणार याविषयी आता शहरात चर्चेला उधाण आले आहे. कोतकर यांच्या कौलावरच नगर शहरातील आमदार विजयी होणार आहे.
Post a Comment