सोनईत घुमला जयहरी पुन्हाचा नारा... मुरकुटे यांच्या रॅलीला उंदड प्रतिसाद...


सोनई ः
प्रहराचे पक्षाचे अधिकृत उमेदवार बाळासाहेब मुरकुटे यांच्या प्रचार रॅलीला नेवशातील गावा-गावात चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोनई येथे शनिवारी काढण्यात आलेल्या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 

या वेळी उपस्थितांनी नेवाशाच्या विकासासाठी जयहरी पुन्हा नारा दिला. या नाऱ्याने सोनई परिसर दणाणून गेला होता. या रॅलीच्या वेळी अनेकांनी मुरकुटे यांचा सत्कार करत आम्ही तुमच्या सोबत आहोत, असा शब्द दिला.

प्रहारचे उमेदवार बाळासाहेब मुरकुटे यांचा तालुक्याच प्रचाराचा झंजावत दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आमदार शंकरराव गडाख यांच्या गटातील नाराज मंडळी मुरकुटे यांना साथ देत आहे. ही साथ मुरकुटे यांचा विजयाचा पाया भक्कम करीत आहे. काहीजण विरोधकांबरोबर राहून मुरकुटे यांना साथ देत आहेत. 

नेवासा तालुक्यात विकास कामे बाळासाहेब मुरकुटे यांनी आमदार असताना केलेली आहेत. त्याच कामामुळे या वेळीही मुरकुटे यांना तालुक्यातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. भाजपमधून बाहेर पडत त्यांनी प्रहारची उमेदवारी घेतलेली आहे. प्रहारचे नेते व कार्यकर्ते मुरकुटे यांना निवडून आणण्यासाठी आता प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. त्यांच्या प्रयत्नांना आता यश येत आहे.
 

सोनईसह परिसरातील गावांमध्ये आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी रॅली काढून चौकसभा घेऊन त्यांनी मतदारांशी संवाद साधला. या संवादा दरम्यान, त्यांनी तालुक्यातील जनतेकडून प्रश्न समजवून घेत ते आगामी काळात मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. सोनई परिसरातील दौऱ्यात त्यांना विविध जणांनी साथ देण्याचा निर्णय जाहीर केलेला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post