श्रीगोंदा : आमदार बबनराव पाचपुते व राहुल जगताप यांना आमदार होण्यासाठी मदत केली. मात्र या दोघांनाही मतदारसंघातील मूलभूत प्रश्न सोडविण्यात अपयश आले आहे. तरीही पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात हे दोघे उतरले आहेत. जनता त्यांना नक्कीच धडा शिकवेल असा मला विश्वास आहे, असे प्रतिपादन नागवडे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी व्यक्त केले.
महाविकास आघाडीतील शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे) उमेदवार अनुराधा नागवडे यांच्या प्रचारार्थ कामठी येथे आयोजित कॉर्नर सभेत मतदारांशी संवाद साधताना ते बोलत होते.
यावेळी देवीदास चेमटे, राजू तोरडे, शिवराम शिंदे, गोवर्धन कार्ले, संदीप आरडे, योगेश शिंदे, विठ्ठल शिंदे, भाऊसाहेब आरडे, गोविंद शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
राजेंद्र नागवडे म्हणाले की, आपण यापूर्वी आमदार बबनराव पाचपुते व राहुल जगताप यांना आमदार होण्यासाठी मदत केली. मात्र या दोघांनाही मतदारसंघातील मूलभूत प्रश्न सोडविण्यात अपयश आले आहे. तरीही पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात हे दोघे उतरले आहेत. जनता त्यांना नक्कीच धडा शिकवेल असा मला विश्वास आहे.
साखर कारखान्यांकडील देणी बुडवून शेतकऱ्यांचे वाटोळे केले. तेच आता विधानसभा निवडणुकीत उतरले आहेत. शेतकऱ्यांचे प्रपंच उद्ध्वस्त करून स्वतःचे प्रपंच मोठे करणाऱ्या लुटारूंना विधानसभा निवडणुकीत जनता धडा शिकवेल, असे ते म्हणाले.
नागवडे कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब भोस विरोधकांचा समाचार घेतला. येथील एक उमेदवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात होते. आता ते भाजपचे अनधिकृत उमेदवार असल्याचीही टीका केली.
Post a Comment