श्रीगोंदा : तालुक्यातील सहा ग्रामपंचाषतीच्या निवडणुका होत आहे. या सहाही ग्रामपंचायती आपल्या ताब्यात रहाव्यात यासाठी आमदार विक्रम पाचपुते, माजी आमदार राहुल जगताप व नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे करणार आहेत.
तालुक्यातील भावडी, कोकणगाव, मांडवगण, महांडूळवाडी, राजापूर, दानेवाडी या सहा ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहे. या निवडणुका पक्षाच्या चिन्हावर होत नसल्या तरी नेत्यांच्या वेगवेगळ्या गटाच्या नेतृत्वाखाली स्थानिक पातळीवर होत असतात.
या स्थानिक निवडणुकांमध्ये नेते मंडळी विशेष करून लक्ष देत नाही. परंतु आगामी काळात जिल्हा परिषद निवडणुका होणार आहेत. त्यात आपल्या पक्षाला यश मिळण्यासाठी नेते मंडळींना ग्रामपंचायत निवडणुकीकडे लक्ष द्यावे लागणार आहे.
जगताप, पाचपुते व नागवडे गटाने सहाही ग्रामपंचायतीवर वर्चस्व मिळविण्यासाठी तयारी सुरु केली आहे. त्यामुळे तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापणार आहे.
भावी जिल्हा परिषद सदस्यांनीही तालुक्यातील या ग्रामपंचायत निवडणुकीकडे लक्ष देण्यास सुरवात केली आहे. त्याचा फायदा त्यांना झेडपी निवडणुकीत होणार आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतीच्या निवडणुका चुरशीच्या होणार आहेत.
Post a Comment