अहिल्यानगर ः नवनागापूरच्या आंधळे चौरे कॉलनीत एका घरामध्ये सुरू असलेल्या कुंटणखान्यावर स्थानिक गुन्हे शाखा व एमआयडीसी पोलिसांनी छापा टाकून दोन पीडित महिलांची सुटका केली. या प्रकरणी दोन महिलांसह चौघांविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
किरण रावसाहेब जरे (वय 40 रा. वारूळाचा मारूती, नालेगाव), बाबासाहेब प्रभाकर जाधव (वय 36 रा. श्रीपतवाडी पारगाव, ता. शिरूर, जि. बीड, हल्ली रा. आंबेडकर चौक, सनफार्मा शाळेजवळ, बोल्हेगाव), राणी ऊर्फ ललिता बाळासाहेब ठुबे, संगीता शिवाजी जगताप (दोघे रा. आंबेडकर चौक, सनफार्मा शाळेजवळ, बोल्हेगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
त्यातील किरण जरे व बाबासाहेब जाधव यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून रोख रक्कम, मोबाईल, कार असा सुमारे साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
नवनागापूरच्या आंधळे चौरे कॉलनीत एका घरामध्ये कुंटणखाना सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव, पोलीस अंमलदार संदीप पवार, विजय ठोंबरे, अतुल लोटके, संतोष खैरे, अमृत आढाव, भाग्यश्री भिटे यांच्या पथकाने गुरूवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास सदर ठिकाणी छापा टाकला असता कुंटणखाना सुरू असल्याचे दिसून आले.
पीडित महिलांची सुटका केली आहे. चौघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक अरूण आव्हाड करत आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Post a Comment