पारनेर ः पारनेर - नगर विधानसभा मतदारसंघात बहुरंगी लढत होत असल्याने निवडणुकीतील रंगत वाढलेली आहे. अपक्ष उमेदवार माजी जि्ल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांना पारनेर तालुक्यातून छुपी मदत सुरु झालेली आहे.
तुम्ही लढा आम्ही तुमच्या बरोबर आहे, असे अनेकजण सांगून त्यांना मदत करीत आहे. त्यामुळेच त्यांच्या सभांना उदंड प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अधिकृत उमेदवार राणी लंके व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे उमेदवार काशिनाथ दाते यांच्यात खरी लढत होत आहे. परंतु अपक्ष उमेदवारांमुळे निवडणुकीत चुरस वाढलेली आहे.
माजी आमदार विजय भास्कर औटी, माजी नगराध्यक्ष विजय सदाशिव औटी, संदेश कार्ले, मनसेचे अविनाश पवार, अपक्ष भाऊसाहेब खेडेकर हेही निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेले आहे. या सर्वांमुळे पारनेर विधानसभा मतदारसंघाची निवडणूक चुरशीची होत आहे.
पारनेरमध्ये मातब्बर नेते उभे असल्याने निवडणुकीत चुरस वाढलेली आहे. ही चुरस वाढल्यामुळे निवडणुकीच्या अगोदर अनेकांनी विजयाचा दावे केले होते. ते दावे आता फोल ठरत आहे.
ही सर्व किमया संदेश कार्ले यांनी उमेदवारी केल्यामुळे होत आहे. कार्ले यांनी पारनेर तालुक्यातील जनतेशी संपर्क अभियान सुरु केलेले आहे. या अभियानात त्यांनी मतदारांशी संवाद साधला आहे.
या वेळी तालुक्यातील जनतेने पाणी व रस्त्याचे प्रश्न मांडलेले आहेत. ते सोडविण्याचे आश्वासन कार्ले यांनी दिले आहे. त्यामुळेच त्यांच्या संवाद अभियानाला तालुक्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे.
महाविकास आघाडीसह महायुतीतील नाराजांनी आपली नाराजी उघड करत संदेश कार्ले यांना पाठिंबा दिलेला आहे. तर काहीजण आहेत त्याच गोटात राहून कार्ले यांना पाठिंबा देत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
Post a Comment