राहुरी ः राहुरी-नगर-पाथर्डी विधानसभा निवडणुकीत आमदार प्राजक्त तनपुरे व माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्यात दुरंगी लढत होत आहे. या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, आमदार तनपुरे यांच्यासह कार्यकर्त्यांना दिवसेंदिव मतदारांचा प्रतिसाद वाढत आहे.
आमदार प्राजक्त तनपुरे यांनी प्रचारामध्ये आघाडी घेतल्याचे चित्र दिसून येत आहेत. त्यांच्या गाव भेटींचा धडाका मोठ्या प्रमाणावर सुरु असून मतदारांशी संवाद साधण्यावर त्यांचा भर दिसून येत आहेत. मतदारांचाही त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे.
तनपुरे यांच्या विरोधातील उमेदवार शिवाजी कर्डिले यांनी मतदारांच्या गाठीभेटी सुरु केलेल्या आहेत. परंतु त्यांना मतदारांकडून नाकारले जात असल्याचे चित्र मतदारसंघात दिसून येत आहे. कर्डिले यांना निवडणूक आल्यामुळेच मतदारांची आठवण झाली का असा थेट सवाल आता मतदार करू लागलेले आहेत.
कोरोना काळात ते कोठेच दिसले नाही. जेव्हा आम्हाला गरज होती. तेव्हा आपण लोक कोठे गेला होता, असा थेट सवाल आता कर्डिले समर्थकांना सर्वसामान्य मतदार गावा-गावात करू लागलेले आहेत. सर्वसामान्यांच्या प्रश्नापुढे नेते मंडळी निरुत्तर होत आहे.
थातूरमातूर उत्तरे देऊन वेळ मारून नेली जात आहे. काही ठिकाणी नेते मंडळी प्रचाराला जाणे टाळत असल्याचे दिसून येत आहे. प्रचाराला मतदारसंघात थांबण्याऐवजी काहींची वाहने तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी दिसून येत आहे. नागरिकांना उत्तरे देण्याच्या ऐवजी प्रचारासाठी नियुक्त केलेले लोक देवदर्शन करून मनशांत करीत आहेत.
परिणामी कर्डिले यांच्या प्रचारात अडथळे येत असल्याचे प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. हा अंदाज आगामी काळात वाढला जाणार असल्याची चर्चा सध्या सुरु आहे. यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलेले आहे.
Post a Comment