नेवासा : कर्जत-जामखेड, पाथर्डी -शेवगाव व श्रीगोंदा- नगर विधानसभे मतदार संघात जसे दोन आमदार आहेत. तसेच नेवासा विधानसभा मतदार संघात दोन आमदार राहणार आहे. तशा हालाचाली पक्षांच्या वरिष्ठ पातळीवर सुरु आहे.
नेवाशाला दोन आमदार भेटणार असल्यामुळे सर्वांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे.आगामी काळात नेवाशाचा विकास होणार आहे, असा दावाच केला जाऊ लागलेला आहे.
विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालेले असले तरी मुख्यमंत्रीपदी कोणाची निवड करायची व कोणाला मंत्री मंडळात घ्यायचे याचा घोळ सुरू आहे.
महायुतीतील पक्षांच्या वरिष्ठ नेतांच्या बैठकांवर बैठका सुरु आहे. सध्या महायुतीच चर्चेचे गुर्हाळ सुरु आहे. या चर्चेच्या गुर्हाळात एकमेकांची नाराजी काढून निर्णय घेतला जात आहे. परंतु ठोस निर्णयापर्यंत महायुती पोहचलेली नाही.
राज्यात महायुतीचे सरकार अस्तित्वात अद्याप आलेले नाही. परंतु नेवाशाला विधान परिषदेतून आणखी एक आमदार मिळणार आहे. अशी चर्चा निकाल लागल्यापासून सुरु झाली आहे. या चर्चेने आता चांगलाच वेग घेतला आहे.
नेवाशात पाणी, रस्ते व वीज प्रश्न मोठ्या प्रमाणात आहे. दोन आमदार नेवाशाला मिळालानंतर निश्चितच फायदा होणार असून तालुक्याचा झपाट्याने विकास होणार आहे. यामुळे नेवासकरांनध्ये नवचैतन्य येणार आहे.
दोन आमदारपद नेवाशाला मिळणार असल्यामुळे नेवाशाच्या वैभवात निश्चितच भर पडणार आहे. या पदांच्या माध्यमातून संतांच्या स्पर्शाने पावन झालेल्या नेवासा शहराचाही विकास होणार आहे. (क्रमश:)
Post a Comment