पारनेर ः विधासभा निवडणुकीत पारनेर तालुक्यातून अनेकजण इच्छुक होते. त्यामध्ये माजी सभापती तथा आमदार काशिनाथ दाते यांना आमदरकीची लाॅटरी लागली आहे. आता परंतु हे करत असताना इच्छुक असलेल्या सर्वांना संधी दिल्या जातील, असे आश्वासन वरिष्ठ नेत्यांनी दिले. त्यानुसार इच्छुकांमधील माजी उपाध्यक्ष सुजीत झावरे यांचे जिल्हा परिषदेत पुर्नवसन केले जाणार आहे, अशी चर्चा सध्या पारनेर तालुक्यात सुरु आहे.
पारनेर-विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी माजी नगराध्यक्ष विजय औटी,माजी उपाध्यक्ष सुजीत झावरे, माजी जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे, माजी सभापती काशिनाथ दाते इच्छुक होते. यामध्ये काशिनाथ दाते यांना उमेदवारीची लाॅटरी लागून ते विजयी झालेले आहेत. निवडणूक काळात पारनेर तालुक्यात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या.
उमेदवारी न मिळाल्याने माधवराव लामखडे यांनी अजित पवार गटाची साथ सोडून शरद पवार गटात जाणे पसंत केले. त्यांनी शरद पवार गटात जाऊन प्रचारातही सक्रीय सहभाग घेतला. त्याचा काही अंशी दाते यांच्या मताधिक्यावर परिणाम झाल्याचे दिसून आले.
अजित पवार गटात राहिलेले सुजीत झावरे विजय औटी नाराजच होते. या दोघांनीही उमेदवारी अर्ज भरलेले होते. परंतु माघारीच्या दिवशी सुजीत झावरे यांनी अर्ज माघारी घेतला. मात्र ते प्रचारापासून काही दिवस अलिप्त राहिले. त्यानंतर त्यांच्याशी अजित पवार व सुजय विखे यांनी चर्चा करून त्यांची नाराजी दूर केली. त्यानंतर ते प्रचारात सक्रीय सहभागी झाले.
माजी नगराध्यक्ष विजय औटी हेही उमेदवारी मिळेल, अशी आशा बाळगून होते. त्यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी बंडखोरी केली होती. त्यांच्याशी सुजय विखे यांनी चर्चा केली. त्यानंतर भाळवणी येथे झालेल्या अजित पवार यांच्या सभेत विजय औटी यांनी काशिनाथ दाते यांना पाठिंबा दिल्याचे जाहीर केले. यावेळी अजित पवार यांनी त्यांना तुमच्याकडे लक्ष देऊ काळजी करू नका, ्असा शब्द दिला.
सुजित झावरे यांनी प्रचारात घेतलेली आघाडीनंतर आता सर्वच नेते मंडळींनी दाते यांचा विजय झाल्यानंतर झावरे यांचे पुर्नवसन करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे सुजीत झावरे यांचे आगामी जिल्हा परिषदेत पुर्नवसन होणार असून त्यांना पहिल्या अडीच वर्षात उपाध्यक्षपदाची संधी दिली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याबाबत तालुक्यात जोरदार चर्चा सुरु आहे.
Post a Comment