पारनेर : भाजपचे माजी खासदार डॉ. सुजय विखे-पाटील यांनी लोकसभा निवडणुकीच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी पारनेर तालुक्यामध्ये काही नेत्यांचीमोठ बांधली. त्यांनी सगळ्यांना एक करण्याची रणनिती आखली होती.
भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य विश्वनाथ कोरडे, जिल्हा बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड, माजी नगराध्यक्ष विजय औटी, अशोक सावंत, मधुकर उचाळे, सुनील थोरात, सुजित झावरे, भाजपचे तालुकाध्यक्ष राहुल शिंदे, गणेश शेळके, विक्रम कळमकर, सुषमा रावडे, वसंतराव चेडे, सुभाष दुधाडे, डॉ. भाऊसाहेब खिलारी, पंकज कारखिले, लहू भालेकर, शिवाजी खिलारी यांची मोट बांधली.
या निवडणुकीतून अपक्ष उमेदवार माजी नगराध्यक्ष विजय औटी यांची माघार व महायुती उमेदवार काशिनाथ यांना पाठिंबा देण्यासाठी विखे यांनी विशेष प्रयत्न केले होते. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले. त्यामुळे दातेंचा विजय सुकर झाला.
तालुक्यातील जवळपास ७० ते ७२ हजार महिलांना लाडकी बहीण योजनेचे अध्यक्ष सुनील थोरात यांच्या माध्यमातून लाभ मिळाला. त्या लाडक्या बहिणींनी भरभरून मते दिली.
यासर्वांनी एकत्र काशिनाथ दाते यांना विजयी करण्यासाठी प्रयत्न केले. ही सर्व मोट बांधताना विखे यांचा सहभाग निवडणूक काळात दिसून आला नाही. लोणीतूनच सगळे सूत्र हलवले. त्यातून हा विजय झाला आहे.
Post a Comment