अहिल्यानगर : विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळाले आहे. या यशात महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळे त्यांच्याकडे मंत्रिमंडळातील मोठे खाते राहण्याची शक्यता आहे.
विधानसभा निवडणूक झाली. राज्यात महायुतीला बहुमत मिळाले. आता राज्यात सत्तास्थापन कधी होणार? त्यात जिल्ह्यात कोणाला मंत्रिपद मिळणार याकडे लक्ष लागले आहे. त्यामध्ये भाजपच्या दोघांना, तर अजित पवार गटातील एका आमदाराला मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे नेमके कोणाला मंत्रिपद मिळणार? याची उत्सुकता लागली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीच्या वेळी प्रचारादरम्यान नेत्यांनी मोठ मोठी भाषणे केलेली आहेत. ही भाषणे करताना उमेदवाराला विजयी निधी देतो. याला विजयी करा मंत्रीपद देतो असे नेत्यांनी भाषणे केली.
मतदारांनीही नेत्यांच्या भाषणाला प्रतिसाद भरघोस मतांनी उमेदवार विजयी केलेले आहे. आता नेत्यांना त्यांचे आश्वासनपूर्ती करण्याची वेळ आलेली आहे. जिल्ह्यात मंत्रीपदासाठी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे, आमदार मोनिका राजळे, आमदार संग्राम जगताप, आमदार आशुतोष काळे हे चार जण दावेदार आहे. यामध्ये आणखी दोन आमदारांचा सहभाग झालेला आहे. शिंदे गटाचे विठ्ठल लंघे विजयी झालेले आहेत. त्यांच्या पैकी एकाला मंत्रीपदाची संधी मिळण्याची शक्यता आहे.
यामध्ये महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी जिल्ह्यात महायुतीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी विशेष प्रयत्न केलेले आहेत. त्यांच्या प्रयत्नामुळेच जिल्ह्यात महायुतीचा झेंडा फडकत आहे. त्यामुळे त्यांना मोठी संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र जिल्ह्यातील आणखी दोन आमदारांना मंत्री पदाची संधी मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये आमदार मोनिका राजळे, आमदार आशुतोष काळे, आमदार संग्राम जगताप, आमदार विठ्ठल लंघे, आमदार काशिनाथ दाते, आमदार अमोल खताळ यांचेही नाव चर्चेत आहे. लंघे यांनी विद्यमान आमदार यांचा पराभव करून विजय मिळविलेला आहे. त्यामुळे त्यांना संधी मिळू शकते.
अमोल खताळ यांनी माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचा विजयी रथ रोखला आहे. त्यामुळे त्यांना शिंदे गटाकडून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जिल्ह्याती शिवसेनेची बांधणी करण्यासाठी खताळ यांच्याकडून चांगले काम होईल, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे त्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.
Post a Comment