कराड : नव्या जोमाने कर्तृत्ववान पिढी उभी करायची आहे. त्यामुळे मी थांबणार नाही तर लढणार, असा विश्वास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्र परिषदेत व्यक्त केला.
ज्येष्ठ नेते दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीच्या पूर्वसंध्येला रविवारी शरद पवार कऱ्हाड मुक्कामी आले आहेत. त्यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेत बोलत होते.
ते म्हणाले, की विधानसभा निवडणुकीचा निकाल आमच्या अपेक्षेप्रमाणे लागला नाही. मात्र, मी दुसऱ्याच दिवशी कहऱ्हाडला आलोय. आमच्या तरुण पिढीचा विश्वास वाढविणे गरजेचे आहे.
पवार म्हणाले की,राज्यात विधानसभेचा लागलेला निकाल आम्हाला अपेक्षित नाही. मात्र, लोकांनी दिलेला निर्णय मी मान्य करतो. या निकालाचा अभ्यास करून आत्मपरीक्षण करणार आहोत.
गत अनेक वर्षे मी सामाजिक आणि राजकीय जीवनात आहे. मात्र, असा लोकनिर्णय कधी झाला नव्हता. पराभवाची कारणमीमांसा करून पुन्हा एकदा नव्या उत्साहाने लोकांमध्ये जाऊन उभे राहणे आवश्यक आहे , असे ते म्हणाले.
पवार म्हणाले की, निवडणुकीचा निकाल पाहता अजित पवार यांच्या जास्त जागा आल्या, हे मान्य करायला पाहिजे. अजित पवार आणि युगेंद्र पवार यांची तुलना होऊ शकत नाही, असे ते म्हणाले.
Post a Comment