फटाके वाजविल्याच्या कारणावरून गोळीबार...

 राहुरी : विधानसभा निवडणूक निकालानंतर  गुंजाळे येथे चौकात फटाके वाजविण्याच्या कारणावरून चौघांनी दोघांवर गावठी पिस्तुलातून गोळीबार करत लोखंडी रॉड व कुन्हाडीने हल्ला करत जखमी केले. रविवारी सकाळी साडेनऊ वाजता गुंजाळे येथील शिवाजी चौकात ही घटना घडली.



या हल्यात भाऊसाहेब नवले यांना गोळी लागली आहे. संजय शिवाजी नवले हे गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर अहिल्यानगर शहरातील खासगी हॉस्पिटलमध्ये शिवाजी नवले यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राहुरी पोलिस ठाण्यात प्रसाद (सोन्या) बाबासाहेब चेंडवाल, बाबासाहेब एकनाथ चेंडवाल, संदीप दिलीप चेंडवाल व अविनाश संदीप चेंडवाल (रा. गुंजाळे, ता. राहुरी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी संजय नवले हे रविवारी सकाळी पांढरीपूल येथे जात असताना आरोपींनी त्यांना शिवीगाळ केली. तसेच कुन्हाड, लोखंडी रॉड व पिस्तुलातून गोळीबार करत हल्ला केला. 

या घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक संजय ठेंगे, पोलिस उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे, बोडखे, हवालदार वाल्मीक पारधी, सुनील निकम, आदिनाथ पालवे, सूरज गायकवाड, राहुल यादव, प्रमोद ढाकणे, अंकुश भोसले, ठोंबरे तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग पथकाने घटनास्थळी भेट दिली.

याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे हे पुढील तपास करत आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post