जिल्ह्यात कोण होणार मंत्री...

अहिल्यानगर : जिल्ह्यात सध्या कोण होणार मंत्री यावरच चर्चा सुरु आहे. कोणाला कोणते खाते मिळणार... कोणाला का डावलले जाणार... यासह विविध मुद्दे उपस्थित करून मंत्री कोण होणार यावरच चर्चा झडत आहे.


जिल्ह्यातील भाजपमधून तीन व राष्ट्रवादी काॅंग्रेसमधून दोन आमदारांना मंत्रीपदाचे वेध लागलेले आहे. कार्यकर्ते आपल्या नेत्याला मंत्रीपद मिळावे म्हणून देवांना नवस करीत आहेत. काहींनी पूजा सुरू केलेली आहे. 

प्रत्यक्षात जिल्ह्याला तीनच मंत्रीपद मिळणार असल्याने दोन जणांना निराशा पत्कारावी लागणार आहे. त्यामुळे कोणत्या तीन जणांना मंत्रीपद मिळणार व कोणाला नाकारले जाणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

विधानसभा निवडणुकीत प्रचारासभांमध्ये नेत्यांनी आश्वासनांची खैरात वाटली आहे. ही खैरात वाटताना तुमच्या नेत्याला आम्ही मंत्रीपद देऊ तुम्ही त्यांना विजयी करा असे आवाहन नेत्यांनी मतदारांना केले. मतदार व कार्यकर्त्यांनी आपली जबाबदारी चोख निभावली आहे.

आता नेत्यांची वेळ आली आहे. मात्र नेते मंडळी आता त्यांचे आश्वासनपूर्ती करण्यात मागे पडत असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात मंत्रीपदासाठी पाच इच्छूक आहेत. त्यापैकी तीनच जणांना उमेदवारी मिळणार आहे. बाकी दोनजणांना आणखी काही दिवस वाट पहावी लागणार आहे.

जिल्ह्यातून मंत्रीपदासाठी सध्या भाजपकडून राधाकृष्ण विखे, मोनिका राजळे शिवाजी कर्डिले तर राष्ट्रवादी काॅंग्रेस अजित पवार गटाकडून आशितोष काळे व संग्राम जगताप यांची नावे आघाडीवर आहे. भाजपकडून दोन व अजित पवार गटाकडून एक असे तीनच मंत्रीपद जिल्ह्याला मिळणार आहे. त्यामुळे ते तीन कोण अशीच चर्चा सध्या जिल्ह्यात सुरु आहे.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post