मुंबई : महाराष्ट्राचा नवीन मुख्यमंत्री कोण होणार? यावर गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चा रंगताना दिसतंय. विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे.
भाजपचा मुख्यमंत्री होणारे हे स्पष्ट आहे. देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे नवीन मुख्यमंत्री असणार असल्याची चर्चा आहे. देवेंद्र फडणवीस यांचे नाव फायनल झाल्याचे देखील सांगितले जात आहे..
आज राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्याच्या नावाची घोषणा केली जाऊ शकते. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे 5 डिसेंबर रोजी शपथ घेणार आहेत.
महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे नाव फायनल झाल्याचे भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले. भाजप विधिमंडळ पक्षाच्या नवीन नेत्याची निवड करण्यासाठी बैठक आज किंवा उद्या रोजी होणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नावामध्ये रस्सीखेच सुरू असल्याचे सुरूवातीला बघायला मिळाले. मात्र, त्यानंतर शिंदे हे मुख्यमंत्रीपदाच्य शर्यतीतून बाहेर पडले. त्यांनी पत्रकार परिषद घेत भाजपला मुख्यमंत्रीपदासाठी मार्ग मोकळा करून दिला.
महायुतीला जनतेने मोठा प्रतिसाद दिला असून 230 उमेदवार महायुतीचे निवडून आले आहेत. यामध्ये भाजपा 132, शिवसेना एकनाथ शिंदे गट 57, एनसीपी 41 याप्रमाणे उमेदवार निवडून आले आहेत.
Post a Comment