पदापेक्षा कामाला महत्व देतो...

मुंबई : सत्ता हे साध्य नसून ते आमच्यासाठी जनसेवेचे साधन आहे. मी मुख्यमंत्री म्हणजे 'कॉमन मॅन' समजायचो. पदापेक्षा मी कामाला महत्त्व दिले. आता मी उपमुख्यमंत्री आहे. आता माझी जबाबदारी मुख्यमंत्र्यांबरोबर काम करण्याची आहे. आता 'डीसीएम' म्हणजे 'डेडिकेटेड टू कॉमन मॅन' असे मी समजतो, असे प्रतिपादन नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.


शपथविधी सोहळ्यानंतर मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळाची बैठक आटोपून शिंदे यांनी पक्षाचे कार्यालय असलेल्या बाळासाहेब भवनला भेट दिली. तिथे पत्रकार परिषद घेत त्यांनी मागील अडीच वर्षांत सरकार चालवण्यासाठी सहकार्य केलेल्यांचे आभार मानले.

शिंदे म्हणाले, मागील अडीच वर्षांत आम्ही अशाचप्रकारे काम केले. मला काय मिळाले, यापेक्षा राज्यातील जनतेला काय मिळाले आणि पुढे काय मिळणार, ही भावना मनात ठेवून आम्ही काम केले आणि आता सरकारही त्याच उद्देशाने स्थापन केले. 

मी मुख्यमंत्री म्हणजे 'कॉमन मॅन' समजायचो. पदापेक्षा मी कामाला महत्त्व दिले. आता मी उपमुख्यमंत्री आहे. आता माझी जबाबदारी मुख्यमंत्र्यांबरोबर काम करण्याची आहे. आता 'डीसीएम' म्हणजे 'डेडिकेटेड टू कॉमन मॅन' असे मी समजतो. 

मला मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात फडणवीस व अजित पवारांनी सहकार्य केले, तसे आता उपमुख्यमंत्री म्हणून मी फडणवीसांना संपूर्ण सहकार्य व पाठिंबा देणार आहे. राज्याला पुढे नेण्यासाठी जी मेहनत करायची आहे. त्यात आम्ही कमी पडणार नाही, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post