अहिल्यानगर : अहिल्यानगर जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या अध्यक्षपदी कल्याण रामदास मुटकुळे व उपाध्यक्षपदी मनिषा भिकचंद साळवे यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील अध्यासी अधिकारी किरण आव्हाड यांचे अध्यक्षते खाली झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत ही निवड करण्यात आली.
अध्यक्षपदासाठी मुटकुळे यांच्या नावाची सूचना संचालक राजू दिघे यांनी मांडली, या सूचनेस स्वप्नील शिंदे यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्षपदासाठी साळवे यांच्या नावाची सूचना संचालिका सुरेखा महारनूर यांनी मांडली. त्यास विलास शेळके यांनी अनुमोदन दिले.
या प्रसंगी नूतन अध्यक्ष कल्याण मुटकुळे म्हणाले, सभासदांना दिलेल्या आश्वासनांची १०० टक्के पूर्तता करण्याचे काम संचालक मंडळ करत आहे. संस्थेचे आर्थिक हित व सभासदांचे हित हेच डोळ्यासमोर ठेवून सहकारी संचालक व सभासदांच्या सहकार्याने विविध योजना राबविण्यात येतील असे ते म्हणाले. उपाध्यक्ष मनिषा साळवे यांनी सर्व सहकारी संचालकांचे आभार मानून सभासदांच्या हिताचे निर्णय घेवू असे सांगितले.
सदर प्रसंगी संस्थेचे संचालक संजय कडूस, प्रशांत मोरे, विक्रम ससे, अरुण जोर्वेकर, भाऊसाहेब चांदणे, दिलीप डांगे, चंद्रकांत संसारे, ऋषिकेश बनकर, श्रीमती ज्योती पवार, सुधीर खेडकर, श्रीकांत देशमाने, काशिनाथ नरोडे, कैलास डावरे, योगेंद्र पालवे, संभाजी आव्हाड, प्रशांत निमसे, संस्थेचे व्यवस्थापक राजेंद्र पवार, उपव्यवस्थापक प्रशांत लोखंडे, संस्थेचे सभासद गोरख शेळके, अनिल पंडित उपस्थित होते.
Post a Comment