मुंबई : राज्यातील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार 15 डिसेंबर रोजी नागपूरमधील राजभवन येथे झाला होता. महायुती सरकारमध्ये एकूण 39 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. अखेर मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर आता कोणते खाते कोणाला मिळणार याची उत्सुकता नवीन झालेला सर्वच मंत्र्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना होती.
खातेवाटपचा तिढा जवळपास सुटला असून काही खात्यांवर अजूनही चर्चा सुरू आहे.मात्र काही खातेवाटप झाले असून यामध्ये प्रामुख्याने महसूल विभाग हा पुन्हा एकदा भाजपकडे आला असून महसूल मंत्री म्हणून पुन्हा एकदा अहिल्यानगर जिल्ह्याचे शिर्डी राहता मतदार संघाचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गळ्यात महसूल मंत्र्यांची माळ पडणार असल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे.
मात्र गृह, अर्थ याबाबत अजूनही चर्चा सुरू असून गृहखाते भाजप आपल्याकडे ठेवेल आणि अर्थ खाते उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देतील आणि नगर विकास पुणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असेल अशीही सूत्रांची माहिती आहे.
कॅबिनेट मंत्री व त्यांचे खाते चंद्रशेखर बावनकुळे : ऊर्जा विभाग, राधाकृष्ण विखे पाटील, महसूल विभाग, हसन मुश्रीफ : कृषी विभाग, चंद्रकांत पाटील : उच्च व तंत्रशिक्षण विभाग, गिरीश महाजन : आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग, आशिष शेलार : अर्थ व नियोजन विभाग, दत्ता भरणे.
अन्न व नागरी पुरवठा विभाग : आदिती तटकरे, महिला व बालकल्याण विभाग : गुलाबराव पाटील, जलसंपदा विभाग : गणेश नाईक, कामगार विभाग : दादा भुसे, पर्यावरण विभाग : संजय राठोड, आदिवासी विकास विभाग : धनंजय मुंडे, सहकार व वस्त्रोद्योग विभाग : मंगलप्रभात लोढा.
गृहनिर्माण विभाग : उदय सामंत, उद्योग विभाग : जयकुमार रावळ, पर्यटन व सांस्कृतिक विभाग : पंकजा मुंडे, सामाजिक न्याय विभाग : अतुल सावे, अल्पसंख्याक विकास विभाग : अशोक उईके, पशुसंवर्धन विभाग : शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम विभाग.
राज्यमंत्री व त्यांचे खाते : माधुरी मिसाळ, कृषी व संशोधन विभाग, आशिष जयस्वाल : ऊर्जा विभाग, पंकज भोयर : नगरविकास विभाग, मेघना बोर्डीकर साकोरे : जलसंपदा विभाग, इंद्रनील नाईक : शालेय शिक्षण विभाग, योगेश कदम : पशुसंवर्धन व दुग्ध विकास विभाग.
ही यादी सध्या सोशल मीडियावर फिरत आहे. याला मात्र अजून दुजोरा मिळाला नाही.
Post a Comment