त्या आमदारांनी पाहिला पुष्पा २

अहिल्यानगर : जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी आपल्याला संधी द्या असे म्हणून मते मागणार्या विद्यमान आमदारांनी सध्या नागपूरमध्ये अधिवेशनाला गेलेले आहेत.  जनतेच्या प्रश्नांपेक्षा ते विरंगुळा करण्यात व्यस्त असल्याचे सोशल मीडियावरील फोटोसेशनवरून नाराजी व्यक्त केली जात आहे.


अधिवेशन काळात नागरिकांचे प्रश्न विधानसभेत मांडून सोडविणे गरजेचे आहे. परंतु आमदार महोदय मात्र नागपूरमध्ये नागरिकांच्या प्रश्नावर चर्चेऐवजी निवांत वेळी मौजमजा करीत फिरत असल्याचे सोशल मीडियावरील फोटोवरून स्पष्ट होत आहे.

निवांत वेळेचा उपयोग मतदारसंघातील असलेले प्रश्न मार्गी लावण्यासाठी खर्ची करणे महत्वाचे आहे. या वेळेत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याशी भेट घेऊन विविध विषय मार्गी कसे लागतील यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. मात्र नवनिर्वाचित आमदार महोदयांचे त्याकडे सर्वांचेच दुर्लक्ष झाले आहे.

राजकारणात ते माहीर असले तरी त्या नवनिर्वाचित आमदारांना विधानसभा नवीन आहे. जिल्हा परिषदेतील कामकाज व विधानसभेतील कामकाज यात फरक आहे. जिल्हा परिषदेत एखाद्या पदाधिकार्याच्या दालनात बसून अधिकार्यांकडून कामे करून घेतली जातात. मात्र मंत्रालयात तसे होत नाही. 

प्रत्यक्ष गेल्यावरच कामे होतात. चित्रपट पहायला जाण्याला जनतेचा विरोध नाही. परंतु जनतेचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देणे गरजेचे आहे. याचा विसर नवनिर्वाचित आमदारांना पडल्याने मतदारांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.



0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post