पुणे : शिनसेनेच्या शिंदे गटातील काहीजण मंत्रिपद न मिळाल्याने नाराज झालेले आहेत. ही नाराजी दूर करण्याचे काम सुरू आहे. परंतु आमदार व कार्यकर्ते नाराज आहेत. काही पदाधिकार्यांनी राजीनामे देण्याची तयारी सुरू केली आहे.
आमदार तानाजी सावंत यांना मंत्रीपद न मिळाल्याने परंडा येथील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तातडीची आढावा बैठक घेतली.
आमदार तानाजी सावंत यांना मंत्री करा, म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून मागणी करण्याचा निर्णय आढावा बैठकीत कार्यकर्त्यांच्यावतीने घेण्यात आला.
जर आमदार तानाजी सावंत यांना मंत्रीपद न दिल्यास दोन दिवसात परंडा तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी सामूहिक राजीनामे देणार असल्याचा बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. आढावा बैठकीत परंडा तालुक्यातील 25 सरपंच उपस्थित होते.
शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत इतके नाराज आहेत की, आजाराचं कारण देत तानाजी सावंत अधिवेशन सोडून तडकाफडकी पुण्याला निघून गेले आहेत.
आता नाराजीचा पुढचा अंक म्हणून आमदार तानाजी सावंत यांनी त्यांच्या फेसबुक व इतर समाज माध्यमावरील धनुष्यबाणाचे चिन्ह हटवले आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो असलेला मी शिवसैनिक असे स्टेटस ठेवून सावंत यांनी अप्रत्यक्षरित्या बंडाचाच इशारा दिला आहे.
Post a Comment