अहिल्यानगर : हिवाळ्यात थंडीमुळे शरीराची पचनसंस्था धीम्या गतीने काम करते, परंतु याच वेळी पौष्टिक फळे व भाज्यांचा मुबलक साठा बाजारात मिळतो. तो प्रत्येकाने घेणे गरजेचे आहे.परंतु अनेकांचे त्याकडे दुर्लक्ष होते.
मग अनेकांना मधुमेहाचा त्रास होतो. तो टाळणे गरेजेचे आहे. त्यासाठी आहार व्यवस्थित असणे गरजेचे आहे. आहार चांगला असला की मधुमेहातून मुक्ती मिळण्यास मदत मिळते.
मधुमेहींसाठी आहार हा त्यांचे आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी एक महत्त्वाचा घटक आहे. डायबिटीजच्या लोकांना खाण्यापिण्याची खूप काळजी घ्यावी लागेत नाहीतर रक्तातील साखर चटकन वाढते. काहींना त्यामुळे रुग्णालयात उपचारही घेण्याची वेळ येते.
रक्तातील साखर वाढल्यानंतर काही भाज्या, फळे व पदार्थ असतात जे रक्तातील साखर पटकन खाली आणतात. डायबिटीज होऊन देत नाहीत. मधुमेहींसाठी उपयुक्त हिवाळ्यातील फळे व भाज्यांविषयी जाणून घेणे महत्वाचे आहे.ज्यामुळे साखर नियंत्रणात ठेवणे सोपे होईल.
आवळा हा हिवाळ्यातील एक प्रमुख फळभाज्यांपैकी एक आहे. त्यामध्ये नैसर्गिकपणे व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, ज्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढते. आवळ्यामध्ये रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्याची क्षमता असते. रोज एक आवळा खाल्ल्याने किंवा त्याचा रस घेतल्याने शरीरातील इन्सुलिनची कार्यक्षमता सुधारते
Post a Comment