शालेय सहलीच्या बसला अपघात....

राहुरी : चिंचोली शिवारात अहिल्यानगर-मनमाड महामार्गावर शालेय सहलीची खासगी बस रस्त्याच्या खाली जाऊन उलटली. बसमध्ये विद्यार्थिनी होत्या. त्या किरकोळ जखमी झाल्या.


राहुरी शहरातील कै. ल. रा. बिहाणी विद्या मंदिर प्रशालेच्या नववी- दहावीच्या विद्यार्थ्यांची सहल गुजरात राज्यातील सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा पाहण्यासाठी चालली होती. राहुरी येथून मंगळवारी (ता.१७) दुपारी दोन वाजता शाळेतून खासगी ट्रॅव्हलच्या दोन बस सहलीसाठी बाहेर पडल्या. 

एका बसमध्ये मुले व दुसऱ्या बसमध्ये मुली होत्या. चिंचोली शिवारात आज दुपारी अडीच वाजता दोन्ही बस शिर्डीच्या दिशेने अहिल्यानगर-मनमाड प्रवास करीत होत्या. रस्त्यावरून समोरून आलेल्या एका वाहनाने मुलींच्या बसला कट मारला. बसच्या चालकाचे नियंत्रण सुटले. 

बस रस्त्याच्या खाली उतरली. रस्ता व साईडपट्टी यांच्यातील अंतर जास्त असल्याने हळूहळू बस डाव्या बाजूला उलटली.

बसमध्ये ४५ विद्यार्थिनी व पाच शिक्षक होते. मुली किरकोळ जखमी झाल्या. दोन मुलींना राहुरी येथे खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. सर्वांची प्रकृती स्थिर आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post